वरील संदर्भिय विषयांन्वये, भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने, इतर सरकारी योजनांप्रमाणेच, प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) आणि पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना (RWBCIS) अंतर्गत हंगामातील पीक विमा दाव्यांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रक्रिया प्रत्येक हंगामात ३ टप्प्यांत केली जाणार आहे.
या संदर्भात, सोमवार, ११ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२:०० वाजता, झुंझुनू, राजस्थान येथे पहिल्या टप्प्यातील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात, रब्बी हंगाम २०२४-२५ आणि मागील हंगामांसाठीच्या DBT – आधारित विमा दाव्यांच्या पहिल्या टप्प्याचे वितरण सुरू केले जाईल. या कार्यक्रमात मा. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री आणि राजस्थानचे माननीय मुख्यमंत्री शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. केंद्रशासनाकडून या कार्यक्रमाची व्यापक प्रसिद्धी करण्यासाठी विमा कंपन्या आणि राज्य सरकारांना सूचना देण्यात आल्या आहेत.
खरीप पीक विमा तपासणी – शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती
खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना ही मोठा आधार ठरते. हवामानातील अनिश्चितता, पावसाचे विलंब किंवा जास्तीचे पाणी, कीडरोग यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी सरकार ही योजना राबवते. विमा भरल्यानंतर शेतकरी आपला स्थिती आणि तपशील ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने तपासू शकतात.
पीक विमा रक्कम तपासण्याची पद्धत
1.पीक विमा योजना संकेतस्थळावर जा – pmfby.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
वेबसाईट लिंक –
2.’Farmers Corner’ पर्याय निवडा – येथे Application असा पर्याय दिसेल.
3.पुढील पेज उगढेल त्यावर login for farmer या बटण वर क्लिक करा.
4.तुमची माहिती भरा – अर्ज क्रमांक, आधार क्रमांक किंवा नोंदणी केलेला मोबाईल क्रमांक टाका. मग आलेला otp टाका.
5. आता पुढे वर्ष आणि हंगाम निवडा – स्टेटस पाहा – यानंतर तुमच्या पीक विमा दाव्याची स्थिती आणि रक्कम जमा झाली का, याची माहिती स्क्रीनवर दिसेल.
दुसरी पद्धत –बँक खात्यात तपासणी करा – रक्कम जमा झाल्यानंतर ती खात्यात आली आहे का, हे खात्याच्या पासबुकद्वारे किंवा मोबाईल बँकिंगने तपासा.
लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी
-
रक्कम जमा होण्यास कधी कधी काही दिवस लागू शकतात.
-
जर रक्कम जमा झाली नसेल तर संबंधित कृषी कार्यालय किंवा बँक शाखेशी संपर्क साधा.
-
अर्ज करताना दिलेली माहिती योग्य असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, अन्यथा रक्कम अडकू शकते.
खरीप पीक विमा रक्कम ही शेतकऱ्यांसाठी कठीण काळात मोठी आर्थिक मदत ठरते. त्यामुळे वेळोवेळी ऑनलाईन तपासणी करून अद्ययावत माहिती ठेवणे गरजेचे आहे.
अशा नवीन सरकारी योजनांची माहिती दररोज जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा.
Faisal bima
Hame bima mila q