कृषि उत्पन्न बाजार समिती, अमळनेर ता. अमळनेर जि. जळगाव यांचे आस्थापनावरील खाली दिलेल्या संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
krushi utpanna bazar samiti amalner recruitment 2025
आवश्यकतेनुसार वरील वेळापत्रकात बदल झाल्यास याबाबत वेळावेळी www.apmcamalner.in संकेतस्थळावर सुचना प्रसिद्ध करण्यात येईल. अशा सुचानांचे वेळोवेळी अवलोकन करण्याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी : दि.१५/०८/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजल्यापासून ते दि.१४/०९/२०२५ रोजी सायंकाळी ११.५९ वाजेपर्यंत
पात्रता /Education Qualification
एकूण जागा : 19
वयोमर्यादा :- उपरोक्त पदासाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवारांचे वय दिनांक १४/०९/२०२५ रोजी दिनांकास अराखीव प्रवर्गासाठी किमान वय १८ वर्ष व कमाल वय ३८ वर्ष राहील. मागासवर्गीय उमेदवारांना ४३ वर्षे वय शिथिल राहील.
परीक्षा शुल्क :-
राखीव प्रवर्गाकरीता रु. 400/- + 18% जी.एस.टी. = रु. 472/-
अराखीव प्रवर्गाकरीता रु. 600/- + 18% जी.एस.टी. = रु. 708/-
नोकरी ठिकाण : जळगाव
सरळसेवा पदभरती संदर्भात महत्वाच्या सूचना खालील प्रमाणे आहे.
१. सर्व पदांकरिता स्वतंत्रपणे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल.
२. उपसचिव, निरीक्षक, सुपरवायझर, कनिष्ट लिपीक, शिपाई, पाहेकरी आणि माळी या पदासाठी एकूण २०० गुणांची ऑनलाईन परिक्षा घेण्यात येईल.
३. कनिष्ठ अभियंता पदासाठी १२० गुणांची ऑनलाईन परिक्षा आणि ८० गुणांची व्यावसायीक चाचणी घेण्यात येईल. १२० गुणांची ऑनलाईन परिक्षा झाल्यावर जो पर्यन्त ८० गुणांची व्यावसायीक चाचणी होत नाही तो पर्यन्त सदर पदांचा निकाल जाहीर केला जाणार नाही.
४. उमेदवार एकापेक्षा अधिक संवर्गासाठी अर्ज करावयाचे असल्यास अश्या प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र्य ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल. त्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील.
५. पात्र उमेदवाराने कृषी उत्पन्न बाजार समितीचे www.apmcamalner.in या संकेतस्थळावर दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून ऑनलाईन अर्ज सादर करावा. प्रस्तुत पदांसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही पद्धतीने प्राप्त झालेला अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
टीप : इतर सर्व सविस्तर माहिती जाऊन घेण्यासाठी अधिकारीक वेबसाईट भेट द्या तसेच जाहिरात वाचा.
ऑनलाईन अर्ज लिंक | अर्ज करा |
जाहिरात pdf | पहा |
अधिकारीक वेबसाईट | पहा |
परीक्षा प्रवेश पत्र ऑनलाईन प्रिंट काढुन घेणे | याबाबत संकेतस्थळावर सुचना प्रसिद्ध करण्यात येईल. |
ऑनलाईन परीक्षेचा दिनांक | याबाबत संकेतस्थळांवर सुचना प्रसिद्ध करण्यात येईल. |
परीक्षेचा निकाल, कागदपत्र पडताळणी इत्यादी सुचना | याबाबत संकेतस्थळावर सुचना प्रसिद्ध करण्यात येईल |