Kanda anudan gr maharashtra pdf | कांदा अनुदान मंजूर शेतकऱ्यांना मोठा दिलासा

By: Akash P

On: Thursday, August 14, 2025 8:59 AM

kanda anudan 2023 list maharashtra
Follow Us

अखेर कांदा अनुदान मंजूर 2023 – शेतकऱ्यांना मोठा दिलासा

सन २०२२-२३ मध्ये दिनांक १ फेब्रुवारी, २०२३ ते ३१ मार्च,२०२३ या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्री केलेल्या परंतु सदर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावरील नोंदीमुळे अपात्र केलेल्या सर्व प्रस्तावांची फेरछाननी करुन अहवाल सादर करण्याचे पणन संचालक, पुणे यांना दिनांक २९ मे, २०२३ च्या शासन पत्रान्वये कळविण्यात आले होते. त्यानुसार पणन संचालक, पुणे यांनी कांदा अनुदानासाठी फेरछाननी अंती पात्र शेतकऱ्यांचा अहवाल सादर केला आहे.

पणन संचालक पुणे यांनी सादर केलेल्या अहवालानुसार शासन निर्णय दिनांक २७ मार्च, २०२३ अन्वये कांदा अनुदान योजनेसाठी फेरछाननी अंती पात्र शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम उपलब्ध करण्यासाठी रुपये २८ कोटी ,३२ लाख,३० हजार ,५०७.५० इतक्या रकमेची पुरवणी मागणी जुलै, २०२५ च्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आली आहे. सदर मंजूर निधी पात्र लाभार्थ्यांना वितरीत करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या/ खाजगी बाजार थेट पणन अनुज्ञप्तीधारक व नाफेड केंद्रांकडे दिनांक १ फेब्रुवारी, २०२३ ते ३१ मार्च, २०२३ या कालावधीत लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल रु.३५०/- जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी मर्यादेत अनुदान मंजुर करण्याचा शासन निर्णय दिनांक २७ मार्च, २०२३ अन्वये निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक १ फेब्रुवारी, २०२३ ते ३१ मार्च,२०२३ या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्री केलेल्या परंतु सदर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावरील नोंदीमुळे अपात्र केलेल्या सर्व प्रस्तावांची फेरछाननी करून पात्र ठरलेल्या एकूण १४,६६१ शेतकऱ्यांना कांदा अनुदानापोटी एकूण २८,३२,३०,५०७ इतका निधी वितरीत करण्यास शासनाच्या मान्यता देण्यात येत आहे.

kanda anudan 2023 maharashtra

kanda anudan list maharashtra

महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अखेर एक सकारात्मक निर्णय समोर आला आहे. 2023 सालासाठी राज्य सरकारने कांदा अनुदान योजनेला मंजुरी दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून कांद्याच्या बाजारभावात झालेल्या प्रचंड घसरणीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत होते. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी सातत्याने सरकारकडे मदतीची मागणी केली होती. अखेर मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, राज्यातील हजारो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

कांदा अनुदान योजना सन 2022-2023 मध्ये फेरछाननी अंती पात्र लाभार्थ्यांना प्रलांबित काांदा अनुदान वितरित करण्यात येणार आहे.

Kanda anudan -कांदा अनुदान 2023 ची वैशिष्ट्ये

kanda anudan 2023 maharashtra date

  • पात्र शेतकरी: महाराष्ट्रातील कांदा पिकवणारे व विक्री करणारे सर्व शेतकरी.

  • अनुदान दर: प्रति क्विंटल ठराविक रक्कम ( प्रति क्विंटल रु.३५०/- जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी मर्यादेत ).

  • लागू कालावधी: 2023 च्या निवडलेल्या हंगामात विक्री झालेल्या कांद्याला लागू.

  • अर्ज प्रक्रिया: महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज.

  • आवश्यक कागदपत्रे: सातबारा उतारा, विक्री पावती, आधार कार्ड, बँक खाते तपशील इत्यादी.

सरकारचा निर्णय का महत्त्वाचा?

अलीकडच्या काळात कांद्याचे उत्पादन वाढले, पण बाजारातील मागणी कमी झाल्याने भाव कोसळले. अनेक शेतकऱ्यांना उत्पादन खर्च देखील निघत नव्हता. अशा परिस्थितीत सरकारकडून थेट अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला, जेणेकरून शेतकऱ्यांचे नुकसान काही प्रमाणात भरून निघेल.

शेतकरी समाजाची प्रतिक्रिया

या निर्णयाचे स्वागत करताना अनेक शेतकरी नेत्यांनी सरकारला धन्यवाद दिले आहेत. “हा निर्णय उशिरा का होईना, पण शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देणारा आहे,” अशी प्रतिक्रिया मिळाली आहे. मात्र, अनेकांनी कांद्याला हमीभाव व दीर्घकालीन साठवणूक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे.

पुढील कार्यवाही

लवकरच शासन निर्णयानुसार रक्कम वितरणाची प्रक्रिया सुरु होईल. शेतकऱ्यांनी अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

अखेर मंजूर झालेले कांदा अनुदान 2023 हे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा दिलासा आहे. तरीही, दीर्घकालीन पातळीवर कांदा बाजार स्थिर ठेवण्यासाठी हमीभाव, निर्यात धोरण आणि साठवणूक व्यवस्था यावर विशेष भर देणे आवश्यक आहे.


कांदा अनुदान GR

⇒पहा 


दुसऱ्या पोस्ट वाचा 

1.ई-पिक पाहणी हेल्पलाईन नंबर । E pik pahani helpline number

Akash P

माझ नाव आकाश आहे आणि मी एक ग्रॅजुएट विध्यार्थी आहे. त्याबरोबरच मी एक रायटर आहे. मला लिहायला आवडते. नवीन नोकरी आणि योजना तसेच मोबाईल,बाईक अशा विषयावर मी लेख लिहत असतो. आणि माझ्या लिखाणातून लोकांना योग्य ती माहिती देण्याचा प्रत्यन करत असतो.
For Feedback - rcshahu295@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment