महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग मंत्रालय, मुंबई अधिनस्त संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील व कक्षेतील गट-ड (वर्ग-४) संवर्गातील खालीलप्रमाणे विविध रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पध्दतीने (Computer Based Test) स्पर्धा परिक्षेसाठी दिनांक १५/०८/२०२५ पासून दिनांक ३१/०८/२०२५, २३:५९ वाजेपर्यंत या कालावधीत विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
सदरची पुर्ण प्रक्रिया IBPS, या कंपनीमार्फत करण्यात येणार असून अर्ज सादर करण्याबाबतचे अधिकृत संकेतस्थळाबाबतची माहिती https://bjgmcpune.com या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल.
एकूण जागा – 354
अर्ज सुरु होण्याची तारीख – 15-08-2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31-08-2025
gmc pune recruitment 2025 परीक्षा फी –
खुला प्रवर्ग – 1000 /- रुपये
राखीव प्रवर्ग – 900 /- रुपये
वयोमर्यादा – 31 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 38 वर्षे – मागासवर्गीय/खेळाडू/अनाथ: 05 वर्षे सूट
नोकरी ठिकाण – पुणे
परिक्षेचे स्वरुप-
1.परिक्षा ही ऑनलाईन (Computer based Test) पध्दतीने घेण्यात येईल. परिक्षेच्या प्रश्न पत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक ०२ गुण ठेवण्यात येतील.
2.महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागा कडील शासन निर्णय क्र. प्रानिमं१२२२/प्रक्र.५४ / का१३-अ, दि.४ मे, २०२२ मधील तरतुदी नुसार गट ड (वर्ग ४) समकक्ष पदासाठी माध्यमिक शालांत परिक्षा [एस.एस.सी.] हि कमीत कमी अर्हता असल्याने सदर पदासाठी परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त माध्यमिक शालांत परिक्षा [एस.एस.सी.] परिक्षेच्या दर्जाच्या समान राहील. मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा माध्यमिक शालांत परीक्षेच्या [एस.एस.सी.] च्या दर्जाच्या समान राहील व लेखी परीक्षेला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दीक चाचणी या विषयावर प्रश्ना करीता प्रत्येकी ५० गुण ठेवून एकुण २०० गुणांची ऑनलाईन (Computer based Test) परीक्षा घेण्यात येईल.
3.शासन निर्णय, सामान्य प्रशासन शासन निर्णय क्र. प्रानिमं१२२२/प्रक्र.५४/का.१३-अ, दि.४ ते २०२२ मधील तरतुदी नुसार या पदांकरीता मौखिक परीक्षा मुलाखती घेण्यात येणार नाहीत.
ऑनलाईन अर्ज लिंक | पहा |
अधिकारीक वेबसाईट | पहा |
जाहिरात pdf | पहा |