मिरा भाईंदर महानगरपालीक भरती 2025 | mira bhayandar mahanagar palika bharti 2025

By: Akash P

On: Friday, August 22, 2025 8:55 PM

mira bhayandar mahanagar palika bharti 2025
Follow Us

mira bhayandar mahanagar palika bharti : मिरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवरील गट-क संवर्गातील रिक्त पदांची सरळसेवेने पदभरती करणेबाबतची जाहीरात संकेतस्थळावर प्रसिध्द झाली आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवरील गट-क संवर्गातील 358 रिक्त पदांची सरळसेवेने पदभरती करणेबाबत मा. आयुक्त महोदय यांनी दि. 20/08/2025 रोजी मान्यता दिलेली आहे. त्यानुसार गट-क संवर्गातील 358 रिक्त पदांची सरळसेवेने पदभरती करणेबाबतची जाहीरात महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

आयुक्त, मिरा भाईंदर महानगरपालिका हे, महानगरपालिकेच्या मंजुर आस्थापनेवरील गट क संवर्गातील रिक्त पदे भरणेसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवित आहेत.

खाली नमुद केलेली शैक्षणिक अर्हता व पात्रता धारण करणाऱ्या तसेच इतर अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी http://www.mbmc.gov.in या मनपाच्या संकेतस्थळावर दि. 22/08/2025-17.00 ते दि. 12/09/2025 या दिवशी पर्यंत 23.55 वाजेपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावयाचे आहेत.

mira bhayandar mahanagar palika bharti 2025

mira bhayandar mahanagar palika bharti 2025

Education /शैक्षणिक पात्रता 

जाहिरात पहा त्यामध्ये पदानुसार सविस्तर माहिती दिली आहे.

mira bhayandar mahanagar palika bharti एकूण जागा

– 358

अर्ज करण्याची सुरुवात तारीख : 22-08-2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12-सप्टेंबर-2025

परीक्षा फी :

खुला प्रवर्ग: ₹1000/-

मागासवर्गीय/अनाथ: ₹900/-

माजी सैनिक – फी नाही

वयोमर्यादा :

 12 सप्टेंबर 2025  रोजी 18 ते 38 वर्षे

मागासवर्गीय/अनाथ: 05 वर्षे सूट

नोकरी ठिकाण : मिरा भाईंदर

सर्वसाधारण सूचना व अटी-शर्ती

1.वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणांमध्ये वाढ, घट अथवा बदल होण्याची शक्यता आहे.

2. उपरोक्त नमूद संवर्गातील पदासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्यापुर्वी उमेदवारांनी स्वतः खात्री करावयाची आहे की, ते अर्ज करीत असलेल्या पदासाठी विहीत अर्हता अटींची पुर्तता करीत असून सदर पदाकरीता ते पात्र आहेत.

3.ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध (Valid) ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी (Mobile No.) असणे आवश्यक आहे. भरती प्रक्रिया परीक्षेची तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पध्दतीने देण्यात येणार असल्याने, भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.

4.संबंधित पदाच्या/परीक्षेच्या जाहीरात/अधिसूचनेमध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करुनच अर्ज सादर करावा, अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारेच पात्रता ग्राहय धरली जाईल व त्याच्या आधारे निवड प्रक्रिया पूर्ण होईल.

5.अराखीव (खुला) पदांकरीता सर्व उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांचा (मागासवर्ग उमेदवारांसह) विचार केला जात असल्याने सर्व उमेदवारांनी त्यांच्या प्रवर्गासाठी पद आरक्षित/उपलब्ध नसले तरी, अर्जामध्ये त्यांच्या मुळ जात प्रवर्गाची माहिती अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे.

6.अर्ज सादर केलेल्या उमेदवारांस प्राथमिक छाननीच्या आधारे परीक्षेस बसण्याची परवानगी देण्यात येईल. त्यामुळे उमेदवार परीक्षा उत्तीर्ण झाला तरी आवश्यक ती शैक्षणिक व इतर अर्हता असल्याशिवाय व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय निवडीस पात्र राहणार नाही. केवळ परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे उमेदवारांस निवडीचा कोणताही हक्क प्राप्त होणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी पात्रतेच्या अटी अभ्यासूनच अर्ज करावा.

ऑनलाईन अर्ज लिंक   पहा 
जाहिरात pdf   पहा 
आधिरीक वेबसाईट   पहा 
परीक्षा  नंतर कळविण्यात येईल.

Akash P

माझ नाव आकाश आहे आणि मी एक ग्रॅजुएट विध्यार्थी आहे. त्याबरोबरच मी एक रायटर आहे. मला लिहायला आवडते. नवीन नोकरी आणि योजना तसेच मोबाईल,बाईक अशा विषयावर मी लेख लिहत असतो. आणि माझ्या लिखाणातून लोकांना योग्य ती माहिती देण्याचा प्रत्यन करत असतो.
For Feedback - rcshahu295@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment